त्या स्मशानभुमीच्या भ्रष्टाचार प्रकरणी विराेधी पक्ष होणार सक्रीय
शेगाव- अाजच्या मानवी जिवनाचा अविभाज्य भाग असलेल्या स्मशानभुमी ही प्रत्येक गावात असणे ही काळाची गरज अाहे. आणि त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या खासदार निधीतुन या गावात जिवनाच्या अंतिम विधीसाठी स्मशानभुमीच्या विकासाकरीता निधीची उपलब्धता करुन देण्यात कसलीच कसर न सोडल्याने ग्रामस्थ हे खासदार साहेबांचेे आभार मानतात. तरी प्रशासनाच्या वतीने याकामाकरीता मंजुर टेंडर आणि झालेल्या विकासकामात झालेल्या भ्रष्टाचारामुळे फक्त बिले काढण्यापुरतेच काम केले असल्याचा अारोप ग्रामस्थांचा आहे.
स्थानिक पातळीवर असलेल्या याकामाबाबत संतप्त ग्रामस्थांच्या वतीने आयुक्त, जिल्हाधिकारी, व संबधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. तरी या चौकशी प्रकरणात फक्त नौंटकी करण्यात येत असल्याने ग्रामस्थ या गैरप्रकरणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेणार आहेत. आणि या प्रकरणाचे गांभीर्य पाहता चौकशी करुन स्मशानभुमी सारख्या सामाजिक कामातील भ्रष्टाचार हा जनसामान्यांच्या जिव्हारी लागला आहे.तरी या प्रकरणी मेहकर येथे ग्रामस्थांचा मोर्चा भेट घेण्याकरीता जाणार आहेत.
स्थानिक बातम्याकरीता चॅनलला सबक्राईब करा
तर या भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामस्थंाना पाठिंबा देण्याकरीता अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी गावात घटनास्थळाला भेट दिली अाहे. तरी ग्रामस्थांच्या स्मशानभुमीच्या
भ्रष्टाचार प्रकरणी लढा देण्यासाठी जिल्हयात कार्यरत असलेल्या अनेक संघटना आणि राजिकय पक्ष हे सुध्दा आंदोलनात सहभाग नोंदविण्यास तत्पर असल्याचे वातावरण आता ग्रामपातळीवर असल्याचे चित्र मागील 4 दिवसात पहावयास मिळत आहे.
त्यामुळे न्याय हक्कासाठी अनेक संघटना व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्यास आमचं पाठबळ वाढेल असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव हे लवकरच मेहकर ला दाखल झाल्यास ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने भेटीला जाणार असल्याचे तक्रारकर्ते कैलास डाेबाळे यांनी जनसमूहशी बोलतांना सांगितले.



Pingback: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री; घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 'इतक्या' रुपयांच