E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री; घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ!

शेअर करा : 𝕏
आजच्या दैनंदिन जिवनाचा अविभाज्य घटक असलेल्या घरगुती गॅस च्या वाढलेल्या दरामुळे  सर्वसामान्य नागरिकांवर महागाईचा एक मोठा आघात झाला आहे.सद्यास्थितीला गृहणींचे स्वंयपाक घरातील अार्थिक नियोजन महागाईने आधीच कोलमडले असतांना  घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल29 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
मागील तिन महिन्यात घरगुती गॅस च्या किंमतीमध्ये दुसरी वेळ आहे. आता मागील काही दिवसापासून गॅस टंचाईमुळे अनेकांवर मोठे संकट उदभवले असतांना अनाधिकृतपणे नागरिकांची पिळवणुक केली होती. तर आता वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज प्राप्त झाले माहीतीनुसार घरगूती  सिलेंडर चे नवीन दर 7  जून 2026 पासून लागु झालेआहेत. पुर्वी 913 रुपयाला 14.2 किलेाचा घरगुती गॅस आता 942 रुपयांवर पोहचला आहे. त्या आगोदर 7 मार्च 2026 रोजी याच सिलेंडर करीता 60 रुपयाने वाढ करण्यात आली होती.

जागतिक युध्दामुळे दर वाढ

जागतिक पातळीवर सुरु असलेल्य युध्दाचा परिणाम हा वाढत्या महागाईला समोरे जावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चे तेल आणि इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे मार्च मध्ये झालेल्या दरवाढीनंतरही तेल. विपनन कंपन्यांना घरगुती गॅस विक्रीत मोठा तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती मिळाली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार वाढत्या आर्थिक ताणामुळे कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

स्मशानभुमीच्या भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामस्थ घेणार केंद्रीय मंत्र्याची भेट! 

जागतिक युध्दामुळे डिझेल  व पेट्रोलही महागलेे

महागाई  फक्त घरगुती गॅस पुरतीच मर्यादित राहीली नाहीत तर व्यवसायिक गॅसच्य दरातही मोठी वाढ करण्यात आली असल्याने हॉटेल व्यवसायिक अडचणीत आल्याचे वास्तव्य समोर येत आहे. तर दैनंदिन वापराकरीता असलेल्या वाहनांकरीता लागणारे पेट्रोल , ढिझेल आणि सीएनजी च्या दरात महिन्याभरात सातत्याने झालेली दरवाढ ही सर्वसामान्यांना डोकेदुखीची टरु लागली आहे.  मे महिन्यात डिझेल 7.50 ने महागले तर पेट्रोल 11 रुपयांनी महागले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच बरोबर सीएनजीच्या दरात 6 रुपये प्रति किलो ने हे दर वाढले आहेत.
सातत्याने आवश्यक असलेल्या इंधन दरात वाढ होत असल्याने मानवी जिवन प्रभावित झाले असून सर्वांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे हे विशेष

1 thought on “सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री; घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ!”

  1. Pingback: बुलढाणा पोलीस दलात मोठी खळबळ; जळगाव जामोद येथील बनावट हत्याकांड प्रकरणी दोन अधिकाऱ्यांवर गाजले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top