जागतिक स्तरावर सुरु असलेल्या युध्दाचे परिणाम हे संपुर्ण देशाला महागाईचे चटके देत असले तरी दैनंदिन वापरातील कच्चा माल, इंधन, गॅस अादीचे दर गगनाला भिडाले असून त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायवर मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे वास्तव्य आता हॉटेल व्यवसायिक व्यक्त करीत आहेत. तर याचा परिणाम सर्वसामान्य नागरिक असणाऱ्यांच्या खिश्यावर त्याचा ताण जाणवतो एवढे मात्र निश्चीत.
जागतिक पातळीवर सुरु असलेल्या प्रारंभीच्या काळापासून हॉटेल व्यवसायिकांना गॅसचा तुटवडा जाणवू लागला असल्याने हॉटेल व्यवसाय सुरळीत ठेवण्याकरीता अवाजवी दरामध्येे गॅस सिलेंडर घ्यावे लागले आणि कच्च्या तेलाचा व इंधनाचा पुरवठा या जागतिक युध्दामुळे थांबला व उशिरा होत असल्याने कच्च्या मालामुळे गॅस विपनन करणाऱ्या गॅस कंपन्याना होत असलेला तोटा पाहता व्यवसायिक गॅस सिलेंडर तसेच डिझेेल व पेट्रोल सह सीएनसीच्या दरातही मोठी वाढ केल्याने होणारी वाहतुक यंत्रणा सुध्दा महागली आणि त्याचा परिणाम हा विशेषतः हॉटेल व्यवसावर मोठ्या प्रमाणात झाल्याने ग्राहकांना सुध्दा या वाढीव दराचा त्रास होत असून ग्राहकांना सुध्दा या महागाईचा फटका बसला आहे.
मागील तीन महिन्यात व्यवसायिक तसेच घरगुती गॅस च्या दरामध्ये झालेली दरवाढ आणि डिझेल पेट्रोल चे वाढते दर पाहता वाहतुक सेवा सुध्दा महागल्या आणि त्यामुळे दैनंदिन वस्तु सुध्दा महागल्या आहेत. अाणि शहरी भागातील असलेल्या मोठ मोठ्या खानावळी हॉटेल व्यवसायिकांना सुध्दा चांगली सुविधा आणि कामगार वेतन, भाडे पाहता ही दरवाढ मोठ्या प्रमाणात करावी लागली आहे.
तरी त्याचा परिणाम आता ग्राहकांच्या खिश्यावर होत असून चांगले खाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. असे हॉटेल व्यवसायिकांनी सांगितल आहे.
गॅस,किराणा महागला, कामगारांची वेतनवाढ मागणी
सद्या वाढत्या महागाईमुळे अनेक व्यवसायावर संकट ओढावले आहे. व्यवसायिक गॅस आणि घरगुती गॅस सोबत इंधनाचे दर वाढल्यामुळे दैनंदिन जिवनाकरीता मिळत असलेली मजुरी कमी असल्याने कामगरांची वेतन वाढीची मागणी आता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने हॉटेल व खानावळीतील दरातही वाढ करावी लागत असल्याचे मत हॉटेल व्यवसायिकांनी जनसमूहशी बोलतांना व्यक्त केले.


