यावेळी मान्सूनचे आगमन हे विलंबाने जरी झाले असले तरी मान्सून हा गुरुवारी केरळात दाखल झाला असून सद्या मान्सुनचा प्रवास उत्तर दिशेने सुरु आहे. शुक्रवारला मान्सून गोव्याची काही भागात दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाच्या माध्यमातुन देण्यात आली आहे. मान्सनू हा महाराष्ट्राच्या सिमेपर्यंत पोहचला आहे. लवकरच हा मान्सून कोकणात दाखल होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या महाराष्ट्रवासयिांना लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
उपग्रहाच्या छायाचित्रानुसार केरळ किनारपट्टी, कर्नाटक आणि गोव्यातील संपुर्ण किनारपट्टीवर सकाळी ढगाचे आच्छादन दिसून येत होते त्यामुळे हा मान्सून पुढे सरकत असल्याचे दिसून आले आहे. प्राप्त माहितीनुसार अरबी समुद्राच्या आणखी काही भागासोबतच गोव्याच्या काही भागामध्ये मान्सूनने प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 ते 3 दिवसात नैऋत्य मान्सून मध्य आरबी समुद्र, कर्नाटक, महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशातील काही भाग व गोवा तसेच ईशान्य भारतातील काही राज्यामध्ये आणखी पुढे सकरण्यासाठी हवामान स्थिती अनुकुल असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
मान्सून गोव्यात दाखल होताच दुसरा ट्टपा हा कोकणात असल्याचे मानले जाते तरी मान्सून आगमनाकरीता हवामान स्थिती अनुकूल असल्याने मान्सून राज्याच्या दिशेने हळूहळू पुढे सरकत आहे लवकरच मान्सून राज्यात प्रवेश करेल आणि कोकणात मान्सूनची तिव्रता वाढण्याची शक्यता हवामान वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाने शुक्रवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या कोकणातील जिल्हयामध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या जिल्हयांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर, सातारा, नाशिक, अ.हिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धारशिव, लातुर, नांदेड आदी भागात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.


