अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर चौकशीची नौंटकी, ग्रामस्थ झाले संतप्त
शेगांव – शेगांव तालुक्यात असलेल्या ग्राम तिव्हाण बु येथील स्मशानभुमीकरीता खासदार निधीतुन विकास निधी प्राप्त झाला असतांना या विकासकामाध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकरीता स्थानिक सुजाण ग्रामस्थ कैलास डोबाळे यांनी आयुक्त तथा जिल्हाधिकारी यंाच्याकडे रितसर तक्रार केली होती. परंतु शासनाकडून असलेल्या निकषानुसार या कामाचा दर्जा नसल्यामुळे थातुरमातुर हे विकास काम करण्यात आल्याने या कामाची त्वरीत चौकशी करण्यात यावी अशी मागणी कैलास डोबाळे यांनी केली असली तरी या प्रकरणी मागणी मागील 3 ते 4 महीन्यापासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
स्मशानभुमी हा मानवी जिवनाच्या शेवटचा टप्पा असला तरी या विकासकामात सुध्दा भ्रष्टाचाराची लागण झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थाकडून होवू लागल्याने या विकासकामाकरीता प्राप्त निधी आणि विकासकामाचा दर्जा याबाबत ग्रामस्थामध्ये संताप पाहता या ग्रामपातळीवरील स्मशानभुमीच्या कामात असलेल्या सावळा गोंधळाची चौकशी करुन ग्रामस्थांंना न्याय द्यावा अशी मागणी तक्रारीतुन करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरही या कामाबाबतच्या तक्रारी सादर केल्या असल्या तरी विकासकामाबाबत निकृष्ट कामाची तपासणी करण्याबाबत मा. आयुक्त अमरावती विभाग यांचे आदेश आणि जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे आदेश असतांना सुध्दा या कामाच्या दर्जा तपासणीबाबत उपविभागीय स्तरावरुन नौटंकी करण्यात येत असल्याचा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित होवू लागला आहे.
आज देशात विशेषतः मानवी आयुष्यातील शेवटचा अंतिम संस्काराकरीता असलेल्या स्मशानभुमी बाबत बिकट परिस्थीती असतांना बहुतांश ठिकाणी दफनविधीबाबत जागेचा अभाव हा सुध्दा महत्वाचा मुद्दा असला तरी अनेक वर्षानंतर स्मशानभुमीचे विकास काम हा गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतांना लोकप्रतिनिधी यांच्या विशेष फंडातुन या कामाचा विकास करण्याकरीता निधी मिळाला आणि बांधकाम नियमानुसार या विकासकाम होणे अपेक्षित होते. परंतु अत्यल्प कालावधी उलटला असताच या विकास कामाला तडे गेल्याचे चित्र प्रत्यक्ष दर्शनी पाहील्यास निर्दशनास येते. तरी या कामात आयुक्तांच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या विकासकामाच्या दर्जाबाबत उपविभागीय स्तरावरील बांधकाम विभागाकडून केलेली तपासणी ही नक्कीच नौटंकी ठरणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सुजाण तक्रारकर्ते कैलास डोबाळे यांनी या प्रकरणातील गांभीर्य पाहता या प्रकरणाची रितसर तक्रार केली आहे. ग्रामपातळीपासून गटविकास अधिकारी प.स. जिल्हा परिषद कार्यपालन अधिकारी, मा.आयुक्त अमरावती विभाग, मा. जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्याकडून या विकासकामाचे तपासणी होवून ग्रामस्थांना न्याय देण्याचे आदेश दिले आहे. तरी या कामी होत असलेली चौकशी ही नौटंकी असल्याची ग्रामस्थांची ओरड आहे. तरी या प्रकरणाची चौकशी होवून ग्रामस्थांना न्याय न मिळाल्यास हे ग्रामस्थ आंदोलनाची भुमिका घेतील आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असे तक्रार कर्ते कैलास डोबाळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले आहे. तरी प्रशासनाच्या भुमिकेची प्रतिक्षा करीत आहोत असे ते म्हणाले.



Pingback: प्रतिक्षेत असलेला मान्सून आज गोव्यात दाखल. - E-Jansamuh News