E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

होवू घातलेल्या निट पेपर का देण्यात आला 15 मिनीटाचा अतिरीक्त वेळ

शेअर करा : 𝕏
देशभरात झालेल्या निट पेपर फुटीनंतर संपुर्ण भारतात अराजकता माजली होती. त्यानंतर सुपर्ण भारतात वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रवेश घेणाऱ्या निट परीक्षेकरीता या अगोदर 180 मिनीटे इतका कालावधी निश्चीत होता. परंतु आता दि. 21 जून 2026 रोजी दुसऱ्यांदा होणाऱ्या निट परीक्षेकरीता नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातुन ही माहीती प्रकाशित करण्यात आली आहे.
एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार परीक्षेचा सुधारित वेळ हा दुपारी 2.00 ते 5.15 हा वेळ निश्चीत केला आहे. तर याकरीता 195 मिनीटे इतका कालावधी असल्याचे नमूद आहे. तर यावेळी होणाऱ्या परीक्षेच्या पेपरमध्ये रफ काम करण्याकरीता 2 पानाऐवजी 4  पाने वापरण्यात आली असून प्रश्न पत्रिकेत रिक्त जागा दिली असल्याची माहिती मिळाली आहे.
21 जून रोजी एनटीए कडून ही  फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. मागील पेपर फुटी प्रकरणात  विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. त्याकरीता यावेळी 15 मिनीटे जास्तीचे मिळणार असल्याचे एजन्सीकडून सांगण्यात आले आहे. आणि रफ कामाकरीता अतिरीक्त जागा प्रश्नपत्रिकेत समाविष्ट करण्यात आली.

या अगोदर 3 मे 2026 रोजी  झालेली  परीक्षा निट पेपर फुटीच्या घटनेमुळे परीक्षा रद्द करण्यात आली. पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली नीटची पुनःश्च एनटीए कडून नव्याने 21 जून रोजी  घेण्याचे निश्चीत केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या प्रवेशाचे वेळापत्रक लांबणार असल्याची प्रतिक्रीया पालकांकडून व्यक्त केली आहेत.

संत नगरीच्या प्रवेशद्वाराची दुरवस्था; शेगाव बस स्थानकातील समस्यांबाबत मनसेचे निवेदन

देशभरातील विविध राज्यात निट परीक्षेच्या पेपर फुटीबद्दल प्रसारमाध्यमात चांगला गाेंधळ उडाला असतांना  आता निट एजन्सीकडून  नव्याने 21 जून ला ही परीक्षा होत आहे. तर याचे वेळापत्रक एनटीए च्या पोर्टलवर पाहावयास मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top