E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेगावात ५० वृक्षांचे रोपण व १०० गरजूंना अन्नदान; विविध सामाजिक उपक्रमांनी मनसे सैनिकांचा उत्साह

शेअर करा : 𝕏
शेगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव शहरात मनसे व गो ग्रीन फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेचा संदेश देत वृक्षारोपण व अन्नदान करण्यात आले.  मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
त्यानंतर गो ग्रीन फाउंडेशन व मनसे शेगाव तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने राजेश्वर कॉलनीतील शिवाजी स्विमिंग पूल परिसरात ५० वृक्षांची लागवड करण्यात आली.याचसोबत, सईबाई मोठे सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत सुमारे १०० पेक्षा जास्त गरजूंना भोजन वाटप करण्यात आले. नागरिकांनी मनसेच्या या अनोख्या आणि समाजोपयोगी उपक्रमांचे मोठे कौतुक केले आहे.

 

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या सामाजिक उपक्रमाला माजी नायब तहसीलदार महादेवराव बाजारे, मनसे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख, बुलढाणा जिल्हा सहसंपर्क अधिकारी संजूभाऊ पळसकर, गो ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष विलास शेट्टे आणि एव्ही स्पोर्ट्सचे संस्थापक विपिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांचे विशेष परिश्रमहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसे शेगाव तालुकाध्यक्ष नितीश भावरकर, शहराध्यक्ष परमेश्वर लाहूडकर, उपाध्यक्ष विनोद फुंडकर व सोपान भगेवार, वाहतूक सेना अध्यक्ष रामा इंगळे, विद्यार्थी सेना अध्यक्ष सचिन नागे, विभाग प्रमुख धनंजय लोखंडे, ज्ञानेश्वर नंदाने, समाधान शेगोकार, किरण शेगोकार यांच्यासह गो ग्रीन फाउंडेशनच्या सदस्यांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

1 thought on “राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेगावात ५० वृक्षांचे रोपण व १०० गरजूंना अन्नदान; विविध सामाजिक उपक्रमांनी मनसे सैनिकांचा उत्साह”

  1. Pingback: न.प.शेगांव चा असाही गलथान कारभार! - E-Jansamuh News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top