E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

न.प.शेगांव चा असाही गलथान कारभार!

शेअर करा : 𝕏

नळ कनेक्शन बंद करण्याचा अर्ज दिल्यावरही आकारले बिल

शेगांव- शेगांव नगर परिषद हद्दीत असलेल्या प्रभाग क्र.2 मध्ये असलेल्या एका नागरिकाने नळ कनेक्शन बंद करण्याचा अर्ज देवूनही  तब्बल 3 वर्षे उलटले असले तरी आता नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने पाणी वापरल्याचे बिल दिल्याने आंधळ दळतयं अन कुत्र पिठ खातयं अशी आवस्था येथील व्यवस्थापनाची असल्याची बोंब आता समोर आली आहे.
याबाबत असे की, शेगांव नगर परिषद हद्दीत असलेल्या प्रभाग क्र. 2 मधील रहिवासी घनश्याम मनोहर केला यांचे नावाने नळ कनेक्शन होते सदर कनेक्शन बंद करण्यात यावे याबाबत  दि.  26/12/2023 रोजी रितसर अर्ज सादर केला आणि त्या पाणी वापराचे बिल सुध्दा भरले होते. परंतु पाणी पुरवठा विभागाच्या वतीने त्याकडे कानाडोळा केला असल्याने संबधित नागरिकाला मानसिक धक्का बसला आहे.
नागरी हितासाठी असलेली स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यामध्ये विविध विभागातुन नागरी हितासाठी असलेले पाणी विभाग असताना येथे कार्यरत अधिकारी फक्त पगारापुरतेच वा नियुक्त कंत्राटदार हे देयकापुरते असल्याची जाणीव पिडीत नागरिकाने व्यक्त केली आहे.
अाकोट मार्गावर असलेल्या शेतामध्ये काम करणाऱ्या कामगारांकरीता असलेले नळ कनेक्शन शेत विक्री केल्यामुळे बंद करण्याची मागणी विनंती अर्जातुन केली होती. परंतु तब्बल 3 वर्षे या नळ कनेक्शन बाबत कोणतीच कारवाई न करता आता सन 2026 ला पाणी वापराचे बिल दिल्याने धक्का बसला आहे. तरी याबाबत झालेल्या त्रासामुळे नगर परिषद,शेगांव च्या विरोधात ग्राहक न्यायालयात जाण्याची पाळी आली आहे.
माझ्याकडे विनंती अर्जापासून ते  पाणी कराचा बिल भरणा असल्यामुळे माझी विश्वासहर्ता ही कायम आहे. अन्यथा नगर परिषद पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी नियमांचा खाक्या दाखवून मला सळो की पळो करुन सोडले असते. असेही पिडीत  यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. तरी येणाऱ्या काळात नगर परिषद प्रशासनाच्या मनमर्जीमुळे असलेल्या गलथान कारभारामुळे मानवी हिताला धोका पोहचला असल्याने  या प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी न्यायालयातच ओढावे लागणार असल्याचे पिडीत नागरिक यांनी संतप्त प्रतिक्रीयातुन व्यक्त केले आहे.

1 thought on “न.प.शेगांव चा असाही गलथान कारभार!”

  1. Pingback: शेगावात 'अन्न व औषध प्रशासनाची' मोठी कारवाई! - E-Jansamuh News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top