E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

आशा सेविका व गटप्रवर्तकांचा शेगाव तहसील कार्यालयावर एल्गार; विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन

शेअर करा : 𝕏

सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, पेन्शन, मानधनवाढसह सामाजिक सुरक्षेची मागणी; शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

शेगाव | प्रतिनिधी
आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या आशा सेविका व गटप्रवर्तकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. १० जुलै) शेगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU) संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटना, जिल्हा बुलढाणा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने आशा सेविका व गटप्रवर्तक सहभागी झाल्या.

 

आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत आशा सेविका व गटप्रवर्तकांना कायम सेवेत सामावून सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, सामाजिक सुरक्षा, पेन्शन, भविष्य निर्वाह निधी (PF), ग्रॅच्युइटी तसेच प्रलंबित मानधन तातडीने देण्याची मागणी केली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना महामारीसारख्या संकटाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आशा सेविका व गटप्रवर्तकांनी गावागावांत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. माता-बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब नियोजन, विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी, सर्वेक्षण, निवडणूक व इतर शासकीय जबाबदाऱ्या पार पाडूनही आज त्यांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या आहेत प्रमुख मागण्या
आशा सेविका व गटप्रवर्तकांना कायम सेवेत घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार PF, ग्रॅच्युइटी व पेन्शन लागू करावी.
कोरोना काळातील तीन महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता तातडीने अदा करावा.
योजनाबाह्य अतिरिक्त कामांमधून मुक्तता द्यावी.
मार्च २०२५ पासूनची वाढीव प्रोत्साहन रक्कम एकरकमी द्यावी.
ईएसआय, ईपीएफ व किमान ₹१० हजार मासिक पेन्शनसह सामाजिक सुरक्षा लागू करावी.
आशा सेविका व गटप्रवर्तकांसाठी पदोन्नती धोरण तयार करून ए.एन.एम. भरतीमध्ये आरक्षण द्यावे.
आंदोलनादरम्यान संघटनेच्या प्रतिनिधींनी तहसील प्रशासनाकडे निवेदन सादर करून शासनापर्यंत मागण्या तातडीने पोहोचविण्याची विनंती केली. शासनाने वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला.

</div>

या आंदोलनात संगीता विनोद लोखंडे, वर्षा शशिकांत ठोंबरे, कल्पना अजय आसोळकर, वर्षाली साईनाथ नखरे, पूर्णा प्रमोद जाधवकर, रागिनी गणेश काकडे, अनिता हसन, पूजा अशोक ठोंबरे, भारती विजय चव्हाण, वैशाली गजानन टेकडे, सुषमा राजेंद्र नायडे, शिल्पा उमेश गवाणे, स्वाती सूर्य पवळे, शाहीन गोरख बुरुडकर, रमा केशव मनाकर, भारती विजय पांढरे, संगीता श्रीकांत गवाणे, कविता फुलचंद इंगळे यांच्यासह शेगाव परिसरातील अनेक आशा सेविका व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

 

शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
आरोग्य विभागाच्या कामकाजात आशा सेविका व गटप्रवर्तकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे त्यांच्या प्रलंबित मागण्यांवर शासन कोणती भूमिका घेते आणि या आंदोलनानंतर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे जिल्ह्यातील आशा सेविका तसेच आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top