E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

बुलढाणा पोलीस दलात मोठी खळबळ; जळगाव जामोद येथील बनावट हत्याकांड प्रकरणी दोन अधिकाऱ्यांवर गाजले निलंबन

शेअर करा : 𝕏

या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस महासंचालक सदानंद दाते येणार अमरावतीला!

बुलढाणा जिल्हयात असलेल्या जळगांव जामोद तालुक्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी आता नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोेलीस निरीक्षकक सुनिल अंबुलकर तसेच जळगांव जामोद पोस्टेचे तत्कालीन पोलीस अधिक्षक नितीन पाटील यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
तरी या हत्याकांड प्रकरणी वरीष्ठ अधिकाऱ्यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. तरी या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई होणार कधी असा सवाल चर्चिला जात आहे.

या हत्याकांड प्रकरणी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी ते स्वतः अमरावती येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तरी पोलीस महासंचालक या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री; घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ!

जळगांव जामोद मधील चर्चेत असलेल्या शिवानी कळमेकर हत्याकांड प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून आपल्या मुलीची हत्या न करणाऱ्या मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर जिल्हयातील दुर्गम भागातील खडकी येथील आदिवासी समाजाच्या बापूराम कळमेकर आणि अजय कळमेकर या पितापुत्रांना तब्बल 22 दिवस जेलमध्ये बंद कोठडीत ठेवले परंतु शिवाणी जेव्हा पोलीसांसमोर हजर झाल्याने पोलीस कारवाईचं भिंग फुटलं. आणि न्यायालयाने पिता पुत्रांची जेलमध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली. प्रारंभीला प्रसार माध्यमांना आम्ही स्वतःहून गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे सांगितले.

परंतु आता कळमेकर पिता पुत्रांनी नव्याने मोठा आरोप करीत पोलीसांनी आम्हाला जंगलात . फिरवून मारहाण केली एवढेच नाही तर ही हत्या तुम्हीच केले असे न सांगितल्यास तुमच्या कुटुंबाला उचलून नेऊ या धाकातुन त्यांच्याकडून हा खून केल्याचे कबुल करुन घेतले एवढेच नाही तर आम्हाला सोडायंच असल्यास पाच लाख रुपये पोलीसांनी मागितल्याचा गौप्यस्फोट एका .व्हिडीओ व्दारे कळमेकर पिता पुत्रांनी केल्याचे कळते.

स्थानिक बातम्याकरीता चॅनलला सबक्राईब करा

 

तरी अनेक चर्चेत असलेले या हत्याकांडंत पुरावा नसतांही पोलीसांनी त्या पिता पुत्रांना का केली अटक? तसेच डीएनए अहवाल अगाेदर हा मृतदेह शिवाणी हा अंदाज कसा बांधला? न्यायालयाने दिलेल्या 6 दिवसाच्या पोलीस कोठडीत केलेला तपास? अनोळखी मृतदेहाबाबत पोलीसांनी कोणते निष्कर्ष लावले ? यासारखे अनेक प्रश्न चर्चेत असले तरी याबाबत पोलीस दलातील कोणताच अधिकारी यावर चुप्पी साधून असल्याची माहिती आता समोर आली आहे.

1 thought on “बुलढाणा पोलीस दलात मोठी खळबळ; जळगाव जामोद येथील बनावट हत्याकांड प्रकरणी दोन अधिकाऱ्यांवर गाजले निलंबन”

  1. Pingback:  हॉटेल आणि खानावळींचे दर अचानक का वाढले? हॉटेल चालकांचे धक्कादायक वास्तव! - E-Jansamuh News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top