खामगाव शहर पोलिसांची कारवाई; ४.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त
खामगाव : पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा खामगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चार संशयितांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ४ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पालखी दर्शनासाठी शेगाव येथून खामगावात आलेल्या भाविकांच्या गर्दीत चोरीच्या घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयितांचा माग काढला. पोलिसांच्या तपासात चार जणांचा सहभाग समोर आला.
पोलिसांनी संशयितांकडून सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. गर्दीच्या ठिकाणी भाविकांचे लक्ष विचलित करून दागिने लंपास केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी रोहेल मिलन शिंदे (२१), कोहिनूर बादल वाघी (२४), गायत्री कोहिनूर वाघी (२२) आणि नितीश शंकर भोसले (४५) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे २ लाख १८ हजार ५०० रुपये असल्याचे समोर आले आहे.
बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करा; आमदार श्वेता महालेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी
ही कारवाई खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने केली. या कारवाईत एपीआय सांगळे यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
भाविकांनी गर्दीत सावध राहण्याचे आवाहन
पालखी, यात्रा तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने महिलांनी दागिने व मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी प्रभावी कारवाई केल्याचे दिसून आले.



Pingback: पियुष रघुवंशी यांची VCA स्टेट पॅनल पंच म्हणून निवड; शेगाव क्रिकेट अकॅडमीचा गौरव - E-Jansamuh News