शेगाव (बुलढाणा), प्रतिनिधी : शेगाव-वरवट मार्गावरील भोनगाव फाटा परिसरात अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने ५५ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (२ जुलै) रात्री घडली. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, शेगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीकृष्ण मेहेंगे (वय ५५, रा. आस्वाद, ता. संग्रामपूर) हे २ जुलै रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हिरो होंडा दुचाकी (क्रमांक एमएच ३० क्यू ४९६१) वरून शेगावहून वरवटच्या दिशेने जात होते. भोनगाव फाटा परिसरात पोहोचताच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
‘पवार साहेब सांगतील ते धोरण अन्…’ भाजप प्रवेशाच्या चर्चांवर खासदार अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं!
या भीषण अपघातात राजू मेहेंगे यांना गंभीर दुखापत झाली. धडक इतकी जबरदस्त होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच अपघातात त्यांच्या दुचाकीचे सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी मयताचे पुत्र विशाल राजू मेहेंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून फरार वाहनचालकाचा शोध सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली आहेत.


Pingback: शाळेच्या पहिल्याच दिवशी 'गुड टच-बॅड टच'चे धडे; शेगाव पोलिसांचा विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठ