E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

शाळेच्या पहिल्याच दिवशी ‘गुड टच-बॅड टच’चे धडे; शेगाव पोलिसांचा विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पुढाकार

शेअर करा : 𝕏

 

शेगाव | प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केवळ फुले, टाळ्या आणि पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता, त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी आवश्यक असलेले जीवनमूल्यांचे धडे देण्याचा स्तुत्य उपक्रम शेगाव येथे राबविण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील मौलाना अबुल कलाम आझाद नगरपरिषद उर्दू प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत शेगाव पोलिसांनी विद्यार्थिनींना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ या संवेदनशील विषयावर मार्गदर्शन करून बालसुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण जनजागृती केली.

राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताच शाळांमध्ये प्रवेशोत्सव, मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश वितरणाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला जात असताना, शेगावमधील या शाळेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या वैयक्तिक सुरक्षिततेलाही प्राधान्य देत आदर्श उपक्रम राबविला.

Breaking News- अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

कार्यक्रमात शेगाव पोलीस ठाण्याचे पीएसआय संदीप बारिंगे आणि महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल शबाना पटेल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत चांगला स्पर्श आणि अयोग्य स्पर्श यातील फरक, धोक्याची परिस्थिती ओळखण्याचे मार्ग, विश्वासू व्यक्तींशी संवादाचे महत्त्व तसेच स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी याविषयी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत मार्गदर्शन केले.

स्थानिक बातम्याकरीता चॅनलला सबक्राईब करा

 

यावेळी पोक्सो (POCSO) कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी, बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठीची उपाययोजना, तंबाखू, मद्य आणि अमली पदार्थांच्या व्यसनांचे दुष्परिणाम तसेच विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व यावरही सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही या सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.

कार्यक्रमाला नगरसेवक नदीम पटेल, पत्रकार फहीम देशमुख, अब्दुल समद सर, मो. इमरान अहमद देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इर्शाद खान, मुबीनोद्दीन काझी, रवी चव्हाण यांच्यासह पालक, शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते.

मुख्याध्यापिका निकहत सालेहा मोहम्मद जमीर शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना नवीन शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. नवीन शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव स्पष्ट दिसून येत होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इमरान अली सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अब्दुल समद सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक इमरान अहमद गुलाम नबी देशमुख, अब्दुल समद अब्दुल हकीम, इमरान अली असगर अली, राहत नाज अजहर अहमद खान, आसिया फिरदोस अब्दुल हमीद आणि महेविष देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.

बालसुरक्षेच्या दृष्टीने आदर्श उपक्रम

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना ‘गुड टच-बॅड टच’ची माहिती देत कायदेशीर हक्क, आत्मसंरक्षण आणि धोकादायक परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याबाबत जागरूक करण्याचा हा उपक्रम पालक आणि नागरिकांकडून विशेष कौतुकास पात्र ठरत आहे. शिक्षणासोबत सुरक्षिततेचे संस्कार देणारे असे उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्याची गरज असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

1 thought on “शाळेच्या पहिल्याच दिवशी ‘गुड टच-बॅड टच’चे धडे; शेगाव पोलिसांचा विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पुढाकार”

  1. Pingback: शेगावच्या लेकीची राज्यस्तरावर मोठी झेप! ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कु. श्रेया राऊत मेरिट लिस

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top