E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

जळगाव जामोद येथील श्री आर. एस. पाखरे सरांना ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

शेअर करा : 𝕏

​शेगाव दि. १४ जून २०२६: बी दि चेंज फाउंडेशनतर्फे मुंबईतील ‘आरंभ हॉल’ येथे आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात, जळगाव जामोद येथील डॉ. आंबेडकर विद्यालयाचे सहायक शिक्षक श्री आर. एस. पाखरे सर यांना ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.

​शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान, सामाजिक बांधिलकी आणि आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

शेगावात ‘अन्न व औषध प्रशासनाची’ मोठी कारवाई!

​हा मानाचा पुरस्कार सन्माननीय सुमित रेवरी, सन्माननीय रुक्मिणी गलांडे, अभिनेत्री सौ. निवेदिता पगार आणि श्री. अमृत रोहोम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या प्रसंगी बी दि चेंज फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. मयूर ढोकचौळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

​शिक्षकांचे कार्य आणि प्रेरणा

विश्व मंदिर सोसायटीद्वारा संचालित डॉ. आंबेडकर विद्यालय, जळगाव जामोद (जिल्हा बुलढाणा) येथे कार्यरत असलेले श्री आर. एस. पाखरे सर हे मूळचे खिरोडा (ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) येथील रहिवासी आहेत.आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्यामध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

स्थानिक बातम्याकरीता चॅनलला सबक्राईब करा

 

​या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील सहकारी, विद्यार्थी, पालक, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार भविष्यातील शैक्षणिक कार्यासाठी अधिक प्रेरणादायी ठरेल, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

1 thought on “जळगाव जामोद येथील श्री आर. एस. पाखरे सरांना ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान”

  1. Pingback: शेगाव मनसेच्या आंदोलनाला मोठे यश! नागरी समस्यांवर नगर परिषदेचे लेखी आश्वासन; तूर्तास आंदोलन माग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top