सामाजिक नेतृत्व गणेश शिवाजीराव शेंबडे यांच्या उपक्रमाचे कौतुक; परिसरातील नागरिकांना अंत्यविधीसाठी मदत
शेगाव | प्रतिनिधी
आजच्या धावपळीच्या आणि खर्चिक जीवनशैलीत सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे काम शेगाव शहरातील केला नगर परिसरातील रहिवासी गणेश शिवाजीराव शेंबडे यांनी केले आहे. आपल्या मातोश्री स्व. अंजनाबाई शिवाजीराव शेंबडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांनी नागरिकांसाठी मोफत शवपेटी सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची महाराष्ट्रात चर्चा; निवडणूक आयोगाच्या उत्तरदायित्वावरून संघर्ष
अंत्यविधीच्या प्रसंगी कुटुंबीयांवर दुःखासोबतच आर्थिक जबाबदाऱ्यांचाही भार येतो. अशा कठीण वेळी गरजू कुटुंबांना मदत व्हावी, या सामाजिक भावनेतून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. आईच्या स्मृती जपत समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचा शेंबडे यांचा हा प्रयत्न इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.
या मोफत शवपेटी सेवेचा लाभ शेगाव शहरातील रेल्वे कॉलनी, नरोत्तमदास प्लॉट, सरकारी फैल, छत्रपती शिवाजी महाराज नगर, धनगर नगर, सुरभी कॉलनी, धनोकार नगर, आईस फॅक्टरी परिसर, लालबाबा देवी मंदिर परिसर, हायफाय कॉलनी तसेच आसपासच्या भागातील नागरिकांना घेता येणार आहे.
गरजू नागरिकांनी संपर्क साधावा
या सेवेसंदर्भात अधिक माहितीसाठी आणि शवपेटी उपलब्धतेसाठी नागरिकांनी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेश वसतकार — 9834300360
गोपाल नेरकर — 8087121275
शुभम यादव — 9307150308
आकाश कचरे — 8975569032
दुःखाच्या प्रसंगी गरजू कुटुंबांच्या मदतीला धावून जाणारी अशी सामाजिक सेवा समाजातील सहकार्य, संवेदनशीलता आणि माणुसकीची भावना अधिक दृढ करते.


