E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

शेगाव : राजधानी साडी शोरूमसमोरील वाहतूक कोंडीवर मनसे आक्रमक; ‘नो पार्किंग झोन’ची मागणी

शेअर करा : 𝕏

 रुग्णवाहिका व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने कारवाईची मागणी; शेगाव पोलिसांना निवेदन

शेगाव | प्रतिनिधी
शेगाव शहरातील आठवडी बाजार परिसरात राजधानी साडी शोरूमसमोर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला असून, या ठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ घोषित करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
मनसेच्या निवेदनानुसार, शोरूमच्या मागील बाजूस वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध असूनही ग्राहक मुख्य रस्त्यावर वाहने उभी करत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. परिणामी जीवनज्योती, भुतडा, बनोले व इंगळे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होत असून, परिसरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

</div>

या पार्श्वभूमीवर शोरूमसमोरील परिसर ‘नो पार्किंग झोन’ घोषित करून तेथे स्पष्ट सूचना फलक लावावेत, सर्व वाहने मागील पार्किंगमध्येच उभी करण्याची सक्ती करावी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
मनसे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नितीश भावरकर, शहराध्यक्ष परमेश्वर लहुडकर, वाहतूक सेना शहराध्यक्ष राम इंगळे यांच्यासह धनंजय लोखंडे, ज्ञानेश्वर नंदाने, समाधान शेगोकर, किरण शेगोकर, शिवाचरण पारसकर, कडू धोटेकर, वैभव देशमुख, सागर लांजुळकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आता या जनहिताच्या मागणीवर प्रशासन किती तातडीने निर्णय घेते, याकडे शेगावकरांचे लक्ष लागले आहे.

2 thoughts on “शेगाव : राजधानी साडी शोरूमसमोरील वाहतूक कोंडीवर मनसे आक्रमक; ‘नो पार्किंग झोन’ची मागणी”

  1. Pingback: ध्येय निश्चितीने यशाचा मार्ग; बुरुंगले महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम - E-Jansamuh New

  2. Pingback: शून्यातून उभारला जागतिक उद्योगसमूह; शेगावच्या दांपत्याला 'विदर्भ गौरव' पुरस्काराचा मान - E-Jansam

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top