E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’ यशस्वी; महावितरण अखेर झुकले, जुने मीटर पुन्हा बसवणार; शेगावसह राज्यभरातील ग्राहकांसाठी मोठी बातमी!

शेअर करा : 𝕏

 

विशेष वृत्त राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट वीज मीटर सक्तीच्या मोहिमेला आता जनतेच्या तीव्र विरोधापुढे प्रशासनाला नमते घ्यावे लागत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस उपविभागात ग्रामस्थांच्या तीव्र आंदोलनानंतर आणि चार तासांच्या घेरावानंतर, महावितरणने सक्तीने लावलेले स्मार्ट मीटर काढून तिथे टप्प्याटप्प्याने जुने मीटर पुन्हा बसवण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

या यशस्वी लढ्यामुळे शेगावसह महाराष्ट्रातील लाखो वीज ग्राहकांना वाढीव बिलांविरोधात लढण्यासाठी एक मोठी कायदेशीर ढाल मिळाली आहे.कायद्याची चौकट काय सांगते?

 (कायदेशीर अभ्यास):सिंधुदुर्गातील आंदोलनादरम्यान कायदेशीर तज्ज्ञांनी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘इलेक्ट्रिसिटी ॲक्ट’ (Electricity Act) मधील तरतुदींचा स्पष्ट दाखला दिला आहे.

 

१. मीटर निवडीचा ग्राहकाला अधिकार: कायद्यानुसार ग्राहक कोणत्याही प्रमाणित (Certified) कंपनीचा मीटर स्वतः खरेदी करून वापरू शकतो. महावितरणला विशिष्ट कंपनीचेच स्मार्ट मीटर लावण्यासाठी ग्राहकावर सक्ती करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही.

२. पूर्वसूचनेशिवाय मीटर काढणे हा गुन्हा: ओरोस येथील ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतल्याप्रमाणे, ग्राहकाची लेखी पूर्वसूचना किंवा संमती न घेता जुने मीटर काढून नेणे ही तांत्रिकदृष्ट्या ‘चोरी’ ठरते, ज्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे.

 

MSRTC चा कायापालट: विमानतळासारख्या सुविधा देणारी महाराष्ट्रातील ‘ही’ ५ हाय-टेक बस स्थानके; क्षेत्रफळात पंढरपूरचे ‘चंद्रभागा’ अव्वल!

वाढीव वीज बिलांनी त्रस्त ग्राहकांनी आता काय करावे?

(तज्ज्ञांचा सल्ला):सामूहिक लढा आणि लेखी घेराव: ओरोस पंचक्रोशीतील ग्रामस्थांप्रमाणेच शेगाव आणि इतर भागातील ग्राहकांनी एकत्र येऊन स्थानिक महावितरण कार्यालयावर लेखी अर्जांसह दबाव आणणे आवश्यक आहे.

उच्च यंत्रणांकडे दाद मागा: स्थानिक पातळीवर तोडगा न निघाल्यास ग्राहकांनी वीज ग्राहक पंचायत,  (CGRF – ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच) आणि थेट ‘विद्युत लोकपाल’ यांच्याकडे त्वरित रीतसर तक्रार नोंदवावी.

चाचणीसाठी जुन्या मीटरची मागणी: सिंधुदुर्गात महावितरणने पहिल्या टप्प्यात पाच ग्राहकांचे मीटर बदलून जुने मीटर चाचणीसाठी लावण्याचे मान्य केले आहे. हाच आधार घेऊन प्रत्येक भागातील ग्राहक आपले स्मार्ट मीटर बदलून जुने साधे डिजिटल मीटर पुन्हा बसवण्याची मागणी लावून धरू शकतात.

स्थानिक बातम्याकरीता चॅनलला सबक्राईब करा

 

सिधुंदुर्ग जिल्हयातील ग्राहकांनी तगादा लावून महावितरणला घेरले आणि आपला हक्क मागून घेतला त्या धर्तीवर एकजुटीने लढा देण्याची गरज आता शेगांवकरांची आहे.

तरी सदर बातमी  लिंक https://kokansadlive.com/kokan/oros-/30576

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top