जळगाव–शिरसोली–म्हसावद रेल्वे मार्गावर नॉन-इंटरलॉकिंगचे काम; ६ मेमू गाड्या रद्द, वंदे भारतसह काही गाड्यांच्या वेळेत बदल
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव–शिरसोली–म्हसावद मार्गावर ८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत १२ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसविण्याचे नॉन-इंटरलॉकिंग काम केले जाणार आहे.
८ सप्टेंबरला या ६ मेमू गाड्या रद्द
11119 इगतपुरी–भुसावळ मेमू
11120 भुसावळ–इगतपुरी मेमू
11113 भुसावळ–देवळाली मेमू
11114 देवळाली–भुसावळ मेमू
61129 नाशिक रोड–बडनेरा मेमू
61130 बडनेरा–नाशिक रोड मेमू
महाराष्ट्रात महसूल सेवक भरतीला मंजुरी; 2,912 पदे भरणार, ऑक्टोबरमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू होणार
वंदे भारतच्या वेळेत मोठा बदल
26102 अजनी–पुणे वंदे भारत एक्सप्रेस ८ सप्टेंबर रोजी नियमित सकाळी ९.५० ऐवजी दुपारी १२.५० वाजता अजनीहून सुटणार आहे. तसेच 19004 भुसावळ–दादर एक्सप्रेस देखील नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा सुटणार आहे.
प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची सुधारित परिचालन स्थिती आणि वेळ तपासण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः ८ सप्टेंबरला सकाळच्या प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांनी ही माहिती लक्षात घ्यावी.


