मुंबई : महाराष्ट्र शासनाने १२ जून २०२६ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या ‘महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६’ यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आल्याचे राज्य माहिती आयोगाच्या पत्रातून स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
राज्य माहिती आयोगाचे सचिव रविराज फल्ले यांनी २ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे राज्यातील विविध विभागीय माहिती आयुक्तांना याबाबत कळविले आहे. संबंधित महसुली विभागांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालये व सार्वजनिक प्राधिकरणांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम २७(२) अंतर्गत राज्य शासनाने १२ जून २०२६ रोजी ‘महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६’ राजपत्रात प्रसिद्ध केले होते. मात्र, या नियमांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे आयोगाच्या पत्रात नमूद आहे.
पियुष रघुवंशी यांची VCA स्टेट पॅनल पंच म्हणून निवड; शेगाव क्रिकेट अकॅडमीचा गौरव
या निर्णयामुळे माहिती अधिकार अर्जदार, माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी नियमांच्या अंमलबजावणीबाबत निर्माण झालेली संभ्रमाची स्थिती महत्त्वाची ठरणार आहे.
Jansamuh News पडताळणी
उपलब्ध अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्राच्या RTI Online प्रणालीवर २०२६ चे नियम प्रसिद्ध असल्याचे दिसते; त्यामुळे प्रत्यक्ष अर्ज दाखल करताना संबंधित कार्यालयातील सध्याची कार्यपद्धती व लागू निर्देश तपासणे महत्त्वाचे आहे.
स्रोत : महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे पत्र, दिनांक ०२/०७/२०२६; महाराष्ट्र RTI Online अधिकृत संकेतस्थळ.



Pingback: UPIला १० वर्षे! १.७८ कोटींवरून २४,१६२ कोटी व्यवहारांचा प्रवास; भारताच्या डिजिटल क्रांतीची जगभर दखल