E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

आई धुणीभांडी करते, वडील चौकीदार; आर्थिक विवंचनेतून अकोल्यात नर्सिंगच्या विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल!

शेअर करा : 𝕏

शेगंाव – वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशासाठी असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात सुरु असलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील गैरप्रकारामुळे त्रस्त असलेल्या पालक व विद्यार्थ्यांंवर आलेला ताण असतांना अकोल्यात ह्‍ दयाला हादरा देणारी घटना समोर आली आहे. वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या एक विद्यार्थीनीने आर्थिक अडचणीपायी टोकाचे पाऊल उचलल्याचा तिच्या कुटुंबीयाचा अारोप आहे.

अकोल्यामध्ये जीएनएम नर्सिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या भूमिका धबडघाव हीने आपले जिवन संपविले. घरची आर्थिक परिस्थीती नाजूक असतांना सुध्दा तिने शिक्षणाला प्राधान्य दिले. वडील चौकीदारीचे काम करतात तर आई धुणीभांडी करुन घरचा प्रपंच चालविते.

 

घरातील परिस्थीती बिकट असल्याकारणाने व मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई वडील रात्रदिवस मेहन घेत हाेते. भुमिकेला डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी होते त्यामुळे तिने नीटची परिक्षा सुध्दा दिली होती परंतु आपली अार्थिक परिस्थीती बिकट असल्याकारणाने तीने डॉक्टर बनण्याचे स्वप्न बाजूला ठेवून ती वैद्यकीय क्षेत्रातील नर्सिंग मध्ये करीअर करायचं ठरवलं

प्रवेशावेळी महाविद्यालयाकडून कमी फी सांगण्यात आली होती. मात्र नंतर शुल्कात वाढ होत गेल्याचा आरोप त्या गरीब वडीलांनी केला. आपलं शिक्षण आणि लहान भावाचं भविष्य याचा आर्थिक भार आई वडीलांवर पडत असल्याने भुमिका नेहमीच चिंताग्रस्त असायची असे परिवारातील सदस्यांचे म्हणणे आहे.  घरातील नाजूक परिस्थीती आणि शिक्षणासाठी लागणारा वाढता खर्च यामुळे तीच्या नेहमीच मानसिक दडपण होते. असा दावा तिच्या वडीलांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रत्येकाकडून हळहळ व्यक्त होवू लागली आहे.

गरीब कुटुंबातील आणि होतकरुन विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा वाढता खर्च हा जरी चर्चेचा ठरत असला तरी शिक्षण हे हक्काचे असले तरी पैश्याच्या अडचणीमुळे त्या स्वप्न पाहणाऱ्याचे शिक्षण आणि आयुष्य हे दोन्ही संपुष्‍टात येते ही समाजाची शोकांतिका असल्याच्या भावना या घटनेमुळे व्यक्त होवू लागल्या आहेत.

 

स्थानिक बातम्याकरीता चॅनलला सबक्राईब करा

 

काय म्हणाले भुमिकाचे वडील..

माझ्या मुलीची निट परिक्षा द्यायची इच्छा होती. परंतु त्यामध्ये तिचा नंबर लागला नसल्यामुळे नर्सिंगमध्ये आपले करीअर करायचं तिने नर्सिंग (जीएनएमला ) प्रवेश घ्यायचे ठरवले तेव्हा सुरुवातील 10 हजार म्हणाले. प्रवेश घेतल्यावर 30 हजार म्हणाले त्यानंतर 47 म्हणाले आणि त्यानंतर थेट 90 हजार म्हणाले यानंतर 3 वर्षाचे 2 लाख 70 हजार भरावे लागतील. असे सांगितल्याने माझ्या मुलीने पैसे एकुन इच्छाच सोडली असे सांगत असतांना वडीलांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहत होत्या.

मयत भुमिकेच्या अाई वडीलांच्या आरोपावर पोलीसांची कारवाई काय असेल? हे महत्चाचे भुमिकेच्या मृत्युला नेमके काय करणीभुत आहे. हे तर आता पोलीस तपास यंत्रणेच्या कारवाईतुन समोर येण्याची शक्यता आहे.

1 thought on “आई धुणीभांडी करते, वडील चौकीदार; आर्थिक विवंचनेतून अकोल्यात नर्सिंगच्या विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल!”

  1. Pingback: आयुर्वेदातील अमृत 'गुळवेल': रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी संजीवनी; जाणून घ्या फायदे आणि वापर - E-

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top