E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

शेतकऱ्यांच्या जन्म मरणाचा प्रश्न- आमदारांनी काय विधानभवनात फक्त बसायचे, प्रशासन कुठे आहे?- आ.डॉ.संजय कुटे

शेअर करा : 𝕏

आताची बातमी. विधानभवनात शेतकऱ्यांच्या हीतासाठी आ.कुटेंनी  ओढले  अधिकाऱ्यांवर ताशेरे

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक डाव प्रतिडाव टाकण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून हाेत असल्याने दि. 22 जूून 2026 पासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी हितासाठी जळगांंंव जामोद मतदार संघाचे आ.डॉ. संजय कुटे यांनी ताशेरे ओढत शेतकरी हितासाठी मुख्यमंत्री यांच्या सुचना असतांना आणि अल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी पुन्हा संकाटात आला असतांना त्याच्या अंमलबजावणीबाबत असलेले अधिकारी हे तत्पर नसल्याचे सांगत अध्यक्षांकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीबद्दल ताशेरे ओढले असल्याचे वक्तव्य आज विधान सभेत बोलतांना व्यक्त केले.

महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांची असलेली खडाजंगी ही जरी आज सकाळपासून चर्चेत असली तरी भाजपातून सलग पाचवेळा जळगांव जामोद मतदार संघाचे असलेले आ.डाॅ. संजय कुटे आज विधानसभेत आक्रमक भुमिका घेतांना दिसले. शेतकरी कर्जमाफी आणि इतर समस्याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ध्येय धोरणे ही नक्कीच प्रभावी असली तरी त्याकरीता असलेलेे प्रशासनातील या गंभीर विषयाबाबत  उठविलेला आज आता चर्चेचा ठरु लागला आहे. शेतकरी हितासाठी प्रशासन आणि अधिकाऱ्यांची दिरंगाई ही खपवून घेतल्या जाणार नसल्याच्या इशारा त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सांगतांना व्यक्त केला.

 

शेतकऱ्यांची असलेली बिकट परिस्थीती आणि त्यावर प्रशासनातील अधिकाऱ्यांची दिरंगाई ही नक्कीच या शेतकरी समस्यांचे गांभीर्य लक्षात घेत नाहीत. असा आवाज उठविल्यानंतर मंत्री भुसे यांच्याकडून सावारासावर करण्यात आली  मंत्री महोदय या विषयाबाबत बैठक घेत असल्याचे सांगितले. तरी सुध्दा अधिकारी यांनी या शेतकऱ्यांच्या जन्म मरणाच्या विषयावर आवाज उठविण्याची ही चर्चा त्याचा फिडबॅक देण्याकरीता प्रशासन  आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आहे. या संवेदनशिल विषयाबाबत  प्रशासन आणि त्यासाठी असलेले अधिकारी आजच्या सभागृह पहावयास मिळाले नाही.

स्थानिक बातम्याकरीता चॅनलला सबक्राईब करा

तर आमदारांनी  येथे फक्त बसायचे काम करायचे का? प्रशासन कुठे आहे. असा सवाल संतप्तने केला  यावर मंत्री भुसे यांची सावरासावर झाली.  तरी आ.डॉ.संजय कुटे यांनी विधानभवनात उठविलेला आवाज हा नक्कीच शेतकरी हिताचा असून कुठल्याही पक्षाचा असल्यापेक्षा मी जनतेचा प्रतिनिधी असल्याची आजची त्यांची कणखर भुमिका पहावयास मिळाली.

1 thought on “शेतकऱ्यांच्या जन्म मरणाचा प्रश्न- आमदारांनी काय विधानभवनात फक्त बसायचे, प्रशासन कुठे आहे?- आ.डॉ.संजय कुटे”

  1. Pingback: बुलढाणा जिल्ह्यात २८ जून रोजी 'राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम'; २.३० लाख बालकांना मिळणार 'दोन थे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top