E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

श्रमसाफल्य योजनेतून सफाई कामगारांना मिळणार हक्काचे घर; सतीश डागौर यांची माहिती

 

महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सतीश डागौर यांची शेगावमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी नागपुरात घेतली भेट; प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना

शेगाव : महायुती सरकारची सफाई कामगारांना न्याय आणि हक्क मिळवून देण्याची भूमिका असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना तसेच वाल्मिकी गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून सफाई कामगारांना स्वतःचे हक्काचे घर मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सतीश डागौर यांनी दिली.

दिवाळीनिमित्त नागपूर येथे भाजपा अनुसूचित जाती सेलचे शेगाव शहर अध्यक्ष रितीक छापरवाल यांनी आयोगाचे अध्यक्ष सतीश डागौर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सफाई कामगारांना आवास योजनेचा लाभ मिळावा आणि योजनांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, याबाबत चर्चा करण्यात आली.

हातरुण येथे गोठ्याला भीषण आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

यावेळी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. संजय कुटे हे श्रमसाफल्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगण्यात आले.

सफाई कामगारांना हक्काचे घर मिळण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना आयोगाचे अध्यक्ष सतीश डागौर यांनी या भेटीदरम्यान केली. महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळावा, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

या भेटीवेळी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

सफाई कामगारांना हक्काचे घर मिळावे, यासाठी आता प्रशासनाकडून प्रस्ताव पाठविण्याची आणि योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया किती वेगाने होते, याकडे संबंधित कामगारांचे लक्ष लागले आहे.

1 thought on “श्रमसाफल्य योजनेतून सफाई कामगारांना मिळणार हक्काचे घर; सतीश डागौर यांची माहिती”

  1. Pingback: मनसगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह! १२ पानी चौकशी अहवालातून अनेक अनियमितता समोर - E-Ja

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top