E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

सत्तेची लालसा आणि लोकशाहीचा खेळखंडोबा; जनता वाऱ्यावर, पुढारी टक्केवारीत मग्न!

शेअर करा : 𝕏

लोकशाहीला हरताळ,नेते गुंतले फोडाफोडीच्या राजकारणात.

महाराष्‍ट्र राज्य समृध्द आणि अनेकता एकता जपणारे राज्य असल्याचा बोलबाला हा दिल्ली दरबारी असला तरी महाराष्ट्राचा स्वाभिमान हा नेहमीच दिल्ली दरबारी महत्वाचा राहीला आहे. परंतु मागील 10 वर्षाच्या राजकारणात डोकावून पाहिले असता निवडणुन आलेल्या लोकप्रतिनिधींना सत्ताकारणातच मोठा रस दिसत असल्याने जनतेच्या हितासाठी असलेले प्रशासन आता सत्ताकारणासाठी अविरत असल्याचे वास्तव्य अनुभवयास येवू लागलं आहे. आणि जनता ही तात्पुरत्या मिळालेल्या विविध अनुदानी योजनेचा लाभ घेवून सत्ताधाऱ्यांच्या आमिषाला बळी पडल्याचे वास्तव्य आपण मागील दहा वर्षाच्या काळात पाहू लागलो आहे.

आणि यांच्या सत्ताकारणामुळे स्थानिक स्वराज संस्थेच्या राजकारणाचा मागील 4 वर्षात बट्टयाबोळ करुन नवे नेतृत्वाच्या फळीला ब्रेक लावल्याचे चित्र या सत्ताधाऱ्यांकडून अनुभवयास मिळाले. तर आता राजकारणाकरीता कार्यकर्तेच नसल्याने पक्ष नेत्यांना पगारी गर्दी करण्याशिवाय पर्याय राहीला नाही आणि  सत्ता काबीज करण्यासाठी असलेल्या योजना निवडणुकीआधी राबवुन जनतेला लाभार्थी बनविण्यात धन्यता माणून पुन्हा सत्ताधारी बनण्याची स्पर्धा आता जोमात सुरु झाली आहे.

गॅस तुटवड्यामुळे  सुरु केलेल्या कोरोसीन विक्री योजनेला दिली नापसंती!

तरी जनतेच्या आज स्थितीला असलेल्या समस्या सोडविण्यासाठी असलेली भुमिका ही लयास गेलेली आहे. तर नेहमीच प्रसार माध्यमातुन चर्चेत कसे राहणार याचा ध्यास आता राजकीय पुढाऱ्यांच्या दैनंदिन शैलाचा हा भाग बनलेला आहे. अनेकांच्या अडचणी या बऱ्याच असल्या तरी त्यावर तोडगा काढण्यात कोणतीच भुमिका प्राधान्याने जाणवत नाही.

 

तर सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या  मतदारसंघाचा विकास हा फक्त विकासकामाच्या टक्केवारीपुरताच मर्यादित असल्याचे वास्तव्य आता अनुभवयास येत आहे. नागरी समस्यांच्या बाबतीत तर सांगायलाच नको, दिलेल्या कंत्राटामध्ये असलेला कमिशन टक्का आणि त्यामुळे कंत्राटदारांची मस्ती ही स्थानिक नगर परिषदेच्या माध्यमातुन आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातुन मोठ्या जोमात सुरु आहे.

आणि प्रशासनातील अधिकारी जणु कामाला नव्हे तर हुकुमशाहा असल्याचा वाव घेवून वावरत असतात. त्यांच्यावरही तिळमाळ वचक नसल्याचे वास्तव्य आजच्या परिस्थीतीत पहावयास मिळते. कायदा व सुव्यवस्था असणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या बाबतीतही गावातील वाहतुक यंत्रणा ही सद्या डोकेदुखीची आहे. तर मोठे मंत्री वा नेते गावात येणार तेव्हा सारे प्रशासन मोठ्या दिमतीने कामाला लागते आणि विकास आणि सर्व आलबेल असल्याचा वाव दाखवते.

स्थानिक बातम्याकरीता चॅनलला सबक्राईब करा

 

परंतु ही वास्तविकता आता जनतेच्या जिव्हारी लागू लागली आहे. प्रसार माध्यमात आणि सत्ताकारणात प्रत्येक पक्षाच्या नेत्याला रस असून कोणत्या पक्षाच्या ध्येय धोरणावर आपण निवडणुन आलो याचे सुध्दा भान नसून सद्या सत्ताकारण करण्याकरीता असलेली सत्तेची लालसा ही लोकशाहीला हरताळ फासत आहे. आणि ज्या जनतेच्या मताधिक्क्यावर आपण सत्तेत आलो त्याचा व त्यांना दिलेल्या वचननाम्याचा विसर पडल्याचे वास्तव्य आहेत. आणि पक्ष बदल हा म्हणजे मतदार संघाचा विकास यापुरतेच घोषवाक्य देवून मनमर्जी कारभार सुरु आहे. त्यामुळे या दमदाटीने जनता ही सद्या वाऱ्यावर  आहे. एवढे मात्र निश्चीत

1 thought on “सत्तेची लालसा आणि लोकशाहीचा खेळखंडोबा; जनता वाऱ्यावर, पुढारी टक्केवारीत मग्न!”

  1. Pingback: राजकीय आणि औद्योगिक क्षेत्राचे लक्ष वेधणारा सुप्रिया सुळे यांच्या कन्येचा विवाह सोहळा; रेवती आ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top