E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

गॅस तुटवड्यामुळे  सुरु केलेल्या कोरोसीन विक्री योजनेला दिली नापसंती!

शेअर करा : 𝕏

शासनाचे धोरणाला नागरिकांची नकारघंटा

शेगांव- महाराष्ट्र शासनाच्या धेारणानुसार सर्वसामान्यांना वेळेवर गॅस मिळत नसल्यामुळे शासनाच्या वतीने रेशन दुकानदारामार्फत केरोसीन वाटपाचे नियोजन करण्याची कार्यपध्दती अाखली असली तरी या योजनेला नागरिकांकडून हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.
शासनाने गॅस तुटवडा झाल्याने स्वंयपाकासाठी गॅस सिलेंडर न मिळाल्यास स्वंयपाकाकरीता केरोसीन उपलब्ध करुन देण्याचा निर्धार केला आहे. परंतु यावेळी प्रति लिटर असणारे केरोसीन ला 65 रुपये दर आकारणी शासनाच्या वतीने करण्यात  आली आहे. त्यामुळे केरोसीन विकत घेतल्यानंतर ते पेटविण्यसाठी असलेले स्टाेव्ह यांचा नयनाट होवून तब्बल 10 ते 15 वर्षाचा काळ उलटला असल्याने नेमके  हे केरोसीन घेवून पेटविण्यासाठी नव्याने स्टोव्ह  घेण्यासाठी 500 ते 1000 रुपये खर्च करण्याची कुणाची मानसिकता नसल्याची माहिती रेशनदुकानदार यांच्याकडून मिळाली असून शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक कुटुंबाला रेशनकाड प्रमाणे धान्यसोबत केरोसिन वाटपाची योजना जरी अस्तित्वात आली असली तरी आज महागाईमध्ये प्रति लिटर आकारण्यात येणारा दर हा 65 रुपये असल्याने या योजनेला नापसंती दिली असल्याची वास्तविकता आता अनुभवयास येवू लागली आहे.

जागतीक पातळीवर सुरु असलेल्या युध्दजन्य परिस्थीतीमुळे भारत देशात इंधन म्हणुन येणारा कच्चा माल हा कमी प्रमाणात तसेच वारंवार तुटवडा होत असल्याने शासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आहे. तर रेशनधारकांना केरोसीन वाटपाची योजना ही जरी कार्यान्वित केली असली तरी केरोसीन दर हे 65 रुपये असल्याने नागरिकांनी त्यास नापसंती दिल्याची वास्तविकता आता पुढे आली आहे. यापुर्वी रेशनधारकांना मिळत असणारे केरोसीनचे मुल्य आणि आता मिळणाऱ्या करेोसीनच्या मुल्यात तब्बल 20 पटीने वाढ झाली असल्यामुळे सदर केरोसीन घेवून ते पेटविण्यासाठी पुन्हा नव्याने स्टोव्ह घ्यावा लागणार. त्यासाठी 500 ते 1000 रुपये खर्च करावे लागणार त्यामुळे या योजनेला नापसंत दर्शविल्यामुळे येणाऱ्या काळात ही योजना टिकू शकणार की नाही. हे सांगता येत नाही.

शेगाव मनसेच्या आंदोलनाला मोठे यश! नागरी समस्यांवर नगर परिषदेचे लेखी आश्वासन; तूर्तास आंदोलन मागे

देश अत्याधुनिकतेकडे वाटचाल करीत असल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी आता पुन्हा पारंपारिक पध्दतीने जिवन जगण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. कारण अत्याधुनिक युगात लागणाऱ्या सुविधा या उत्पन्नाच्या तुलनेत खुपच महागड्या होत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जाते हे एक कटु सत्य आहे.
डिजीटल युगाची आणि अत्याधुनिक युगात नागरिकांना मुलभुत सुविधेचा भाग म्हणून स्वयंपाकारीता गॅस आणि त्यासाठी सिलेंडर वापर करण्याची शासनाची योजना असल्यामुळे रॉकेलवर चालणारे स्टोव्ह आणि चुलीवरचा स्वयंपाक  या पारंपारिक पध्दती संपुष्टात आल्या असल्याने आता नव्याने सुरु केलेल्या योजनेला नागरिकांकडुन नापसंती देण्यात येत असल्याचे पहावयास मिळत आहे.

2 thoughts on “गॅस तुटवड्यामुळे  सुरु केलेल्या कोरोसीन विक्री योजनेला दिली नापसंती!”

  1. Pingback: NEET परीक्षेला जाताना नियमांचे पालन महत्त्वाचे; विद्यार्थी अन् पालकांनो, सकारात्मकतेने आणि आत्मव

  2. Pingback: सत्तेची लालसा आणि लोकशाहीचा खेळखंडोबा; जनता वाऱ्यावर, पुढारी टक्केवारीत मग्न! - E-Jansamuh News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top