E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

ईद-ए-मिलादनिमित्त कच्छी मस्जिद येथे रक्तदान शिबिर; मानवतेचा संदेश

शेअर करा : 𝕏

GNRF दावते इस्लामी इंडियाचा सामाजिक उपक्रम; युवकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

शेगाव : ईद-ए-मिलादच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून Garib Nawaz Relief Foundation (GNRF) दावते इस्लामी इंडिया यांच्या वतीने शेगाव येथील कच्छी मस्जिद येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि सामाजिक बांधिलकीतून मानवतेची सेवा घडावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

रक्तदान शिबिराला शेगाव शहराचे सहायक पोलीस अधीक्षक, मौलाना साबित अली साहेब, मौलाना मोहसिन साहेब, मौलाना साहिल साहेब, हाफिज निसार साहेब, कच्छी मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष अमीन भाई मेमन, ईद मिलाद कमिटीचे अध्यक्ष जमील अहमद यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, युवक व नागरिकांची उपस्थिती होती.

‘रक्तदान हे श्रेष्ठ दान’ या भावनेतून अनेकांनी शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे गरजू रुग्णाचा जीव वाचण्यास मदत होऊ शकते, या सामाजिक जाणीवेतून युवकांनी आणि नागरिकांनी पुढाकार घेतल्याचे आयोजकांनी सांगितले.

शेगावात मोबाईल बंद पडला, खात्यातून ९९,८९९ रुपये गायब; सायबर फसवणुकीचा गुन्हा

या उपक्रमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. धार्मिक पर्वाचे औचित्य साधून सामाजिक कार्याला प्राधान्य देण्याचा GNRFचा हा उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी दावते इस्लामी इंडिया बुलढाणा जिल्हाध्यक्ष सोहेल अत्तारी, शेगाव तालुकाध्यक्ष मुनीरुद्दीन, एजाज खान, सय्यद अमान, वसीम खान, सय्यद आफाक, डॉ. ईश्तियाक, अरशद, जुनैद रजा, शहबाज रजा, अयान खान, तालीब यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिराला सहकार्य करणाऱ्या रक्तदाते, मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे आयोजकांनी आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top