E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

ध्येय निश्चितीने यशाचा मार्ग; बुरुंगले महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम

शेअर करा : 𝕏

 

शेगाव : श्री ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगले विज्ञान व कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व ध्येय निश्चिती” या विषयावरील प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमात भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातील सहाय्यक विभाग अधिकारी संकेत कांगटे यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी, स्पष्ट ध्येय, वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला.

शेगाव : राजधानी साडी शोरूमसमोरील वाहतूक कोंडीवर मनसे आक्रमक; ‘नो पार्किंग झोन’ची मागणी

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामविजय (बापूसाहेब) बुरुंगले व प्राचार्या सौ. मीनाक्षीताई बुरुंगले यांच्या प्रेरणेने महाविद्यालयात ‘Competitive Exam Guidance Cell Council’ ची स्थापना करण्यात आली. परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. आर. ई. खडसान तर नोडल अधिकारी म्हणून डॉ. नितेश जी. घुंगरवार यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यार्थी कार्यकारिणीचीही घोषणा करून पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. खडसान यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम व समाजाभिमुख अधिकारी घडविण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन डॉ. नितेश घुंगरवार यांनी केले. कार्यक्रमास १०२ विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा तयारीला नवी दिशा देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

1 thought on “ध्येय निश्चितीने यशाचा मार्ग; बुरुंगले महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम”

  1. Pingback: MSRTC Fare Hike 2026 : महाराष्ट्रात एसटी बस तिकीट दरात १३.५६% वाढ; १८ जुलैपासून नवीन दर लागू - E-Jansamuh News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top