शेगाव:शेगाव शहरातील चोकअप नाल्या, रस्ते आणि मूलभूत नागरी सुविधांच्या दुरवस्थेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज नगर परिषद प्रशासनाविरुद्ध थेट ‘घंटा नाद’ आंदोलन छेडले. मनसेचा आक्रमक पवित्रा आणि कार्यकर्त्यांचा वाढता रोष पाहून अखेर नगर परिषद प्रशासन नरमले.
मुख्याधिकार्यांनी तातडीने अधिकृत पत्र जारी करत मनसेच्या सर्व मागण्या पुढील १५ दिवसांत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. प्रशासनाने नमती भूमिका घेतल्याने मनसेच्या वतीने हे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे.या प्रभागांमधील समस्यांवरून मनसे आक्रमकशहरातील विविध भागांत नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असल्याने मनसे तालुकाध्यक्ष श्री. नितीश भावरकर व इतर पदाधिकार्यांनी प्रशासनाला वारंवार निवेदने दिली होती.
प्रभाग क्रमांक २ व ३ मधील विविध नागरी प्रश्न, तसेच प्रभाग क्रमांक १५ मधील भोईपुरा, धनगरपुरा, गणेश नगर, दशहरा नगर, तीन पुतळे परिसर व आजूबाजूच्या परिसरातील चोकअप झालेल्या नाल्यांची साफसफाई आणि नाल्यालगतच्या रस्त्यांची कामे रखडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.झोपलेल्या प्रशासनाला मनसे स्टाईलने जाग!वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने आज, १८ जून २०२६ रोजी मनसेच्या वतीने थेट नगर परिषद कार्यालयावर धडक देत शांततापूर्ण परंतु आक्रमक मार्गाने आंदोलन सुरू करण्यात आले.
जळगाव जामोद येथील श्री आर. एस. पाखरे सरांना ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान
“जर नगर परिषद प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर यापुढे तीव्र आणि उग्र आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशारा मनसे पदाधिकार्यांनी दिला.सर्वसामान्य नागरिकांचा त्रास आणि मनसेची आक्रमक भूमिका लक्षात घेता, शेगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांनी तातडीने अधिकृत पत्र (जा.क्र. नपाशे/ ८१७ /२०२६ / माकावि) जारी केले.
या पत्रात मुख्याधिकार्यांनी स्पष्ट केले की, “जनहित लक्षात घेता आणि नागरिकांचा त्रास टाळण्यासाठी आपण सादर केलेल्या मागण्या १५ दिवसांच्या आत पूर्ण करण्यात येतील. तरी मनसेने आपले आंदोलन थांबवावे व प्रशासनास सहकार्य करावे.”आंदोलनात मनसेच्या ‘या’ प्रमुख पदाधिकार्यांची फौजया आंदोलनाचे नेतृत्व आणि मार्गदर्शन मनसे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमित बापू देशमुख आणि उपजिल्हाध्यक्ष अशोक पाटील यांनी केले.
आंदोलनाप्रसंगी खालील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते:तालुका व शहर पदाधिकारी: नितीश भावरकर (शेगाव तालुकाध्यक्ष), परमेश्वर लाहुडकर (शहर अध्यक्ष), विनोद फुंडकर (शहर उपाध्यक्ष), सोपान भागेवार (शहर उपाध्यक्ष), योगेश खांडेकर (शहर उपाध्यक्ष), नारायण शेगोकार (शहर सचिव), रोहित भांबेरे (उपतालुकाध्यक्ष).अंगीकृत संघटना: राम इंगळे (वाहतूक सेना अध्यक्ष), सचिन नागे (विद्यार्थी सेना अध्यक्ष), स्वयंपांडव (विद्यार्थी सेना उपाध्यक्ष).विभाग प्रमुख: देवा चिमणकर, धनंजय लोखंडे, संकेत देशमुख, ज्ञानेश्वर नंदाने, मयूर चिंचोलकर, गजानन फासे.सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी: किरण शेगोकार, समाधान शेगोकार, नितीन पद्मने, महादेव माळी, अमोल मेतकर, गोपाल नेरकर, महादेव दही, गणेश राऊत, दत्ता वडतकर, राहुल वानखेडे, अमित दामोदर, सुनील वनारे यांच्यासह असंख्य मनसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
१५ दिवसांत कामे न झाल्यास पालिका अधिकार्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवणार!
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मनसेने तूर्तास आंदोलन स्थगित केले असले, तरी मनसे नेत्यांनी प्रशासनाला कडक शब्दात सुनावले आहे. “जर दिलेल्या १५ दिवसांच्या मुदतीत शहरातील चोकअप नाल्या आणि रस्त्यांच्या समस्या निकाली निघाल्या नाहीत, तर नगर परिषद प्रशासनाला मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल आणि यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,” असा थेट इशारा मनसे शेगाव शहर व तालुका अधिकार्यांनी दिला आहे.



Pingback: गॅस तुटवड्यामुळे सुरु केलेल्या कोरोसीन विक्री योजनेला दिली नापसंती! - E-Jansamuh News