शेगांव :- शिक्षण, समाजसेवा, संशोधन, साहित्य, विज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय व बहुआयामी योगदान देणाऱ्या स्थानिक श्री ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगले विज्ञान व कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.ई. खडसान यांना राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार – २०२६ ” प्रदान करून गौरविण्यात आले.
स्थानिक बातम्याकरीता चॅनलला सबक्राईब करा
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.२६ जून २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय सभागृह, बुलढाणा येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन संजीवनी बहुउद्देसीय शिक्षण प्रसारक संस्था, केळवद जि. बुलढाणा यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष निवृत्तीराजे जाधव यांनी केले होते.
पुरस्कार प्रदान करतांना आयोजकांनी नमूद केले की, डॉ. खडसान यांनी शिक्षण क्षेत्राला केवळ व्यवसाय न समजता समाज परिवर्तनाचे प्रभावी मध्यम म्हणून स्विकारले असून, शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक बांधिलकी, संशोधन, साहित्य, विज्ञान, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या दिशादर्शक व प्रेरणादायी योगदानाची दखल घेऊन त्यांना राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. डॉ. खडसान यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थीकेन्द्री शिक्षण, शैक्षणिक नवोपक्रम, शैक्षणिक नेत्तृत्व, संशोधनपर लेखन, शिक्षक मार्गदर्शन आणि सामाजिक जनजागृत्ती या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने दाखल घेण्यात आली आहे. यापूर्वीही त्यांना विविध प्रतिष्टीत असलेल्या संस्थांच्या वतीने अनेक मानांचे पुरस्कार प्राप्त झाले असून, राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा आणखी एक मनाचा शिरपेच ठरला आहे.
या यशाबद्दल की. पुज्यापिता श्री. मस्कुजी बिरुजी बुरुंगले एज्युकेशन सोसायटी, शेगावचे सन्मानीय अध्यक्ष रामविजय बुरुंगले, सर्व संचालक मंडळ सदस्य, प्राचार्या सौ. मिनाक्षीताई बुरुंगले, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक, सामाजिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. डॉ. आर.ई. खडसान यांच्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे शेगांव तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला असून, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कार्यातून प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.


