E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

शेगावात मोबाईल बंद पडला, खात्यातून ९९,८९९ रुपये गायब; सायबर फसवणुकीचा गुन्हा

शेअर करा : 𝕏

शेगावातील झुडियो मॉलमधील प्रकार; अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल

शेगाव : शेगाव शहरातील झुडियो मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीच्या बँक खात्यातून फोन-पेद्वारे ९९ हजार ८९९ रुपये अनोळखी खात्यात ट्रान्सफर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज गंगाधर खुंटे (वय ४७, रा. ब्रह्मांडनायक नगर, एसटी डेपोसमोर, बुलढाणा) हे १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी पत्नीसमवेत शेगाव येथील झुडियो मॉलमध्ये खरेदीसाठी गेले होते.
यावेळी त्यांचा Oppo कंपनीचा मोबाईल अचानक गरम होऊन बंद पडला. सुमारे दहा मिनिटांनंतर मोबाईल पुन्हा सुरू झाल्यानंतर खरेदी केलेल्या कपड्यांचे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी त्यांनी फोन-पे उघडले. त्याचदरम्यान सायंकाळी ५ वाजून १४ मिनिटांनी त्यांच्या SBI बँक खात्यातून ९९,८९९ रुपये अनोळखी खात्यात ट्रान्सफर झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी स्वतः कोणतेही असे व्यवहार केले नसतानाही खात्यातून रक्कम वजा झाली. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने मोबाईल किंवा संबंधित डिजिटल माध्यमाचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी २५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.५४ वाजता शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निमीष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शेगावातील शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा तुटवडा; १२ ऑगस्टपासून खिचडी वाटप रखडले

दरम्यान, ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना मोबाईलमध्ये संशयास्पद हालचाल, अनोळखी व्यवहार किंवा OTP/UPI संदर्भातील संदेश आल्यास नागरिकांनी तातडीने बँक व संबंधित सायबर यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पोलिस तपासात काय समोर येणार?

मोबाईल बंद पडण्याची घटना आणि त्यानंतर झालेला आर्थिक व्यवहार यांचा परस्पर संबंध आहे का, व्यवहार कोणत्या खात्यात व कोणत्या माध्यमातून झाला, तसेच या व्यवहारामागे नेमकी व्यक्ती किंवा यंत्रणा कोणती आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.
महत्त्वाची नोंद : मोबाईल हॅक झाल्याचा दावा हा फिर्यादीने व्यक्त केलेला संशय आहे. तपास पूर्ण होईपर्यंत मोबाईल हॅक झाल्याचे निश्चित निष्कर्ष म्हणून मांडता येणार नाही.

1 thought on “शेगावात मोबाईल बंद पडला, खात्यातून ९९,८९९ रुपये गायब; सायबर फसवणुकीचा गुन्हा”

  1. Pingback: ईद-ए-मिलादनिमित्त कच्छी मस्जिद येथे रक्तदान शिबिर; मानवतेचा संदेश - E-Jansamuh News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top