आजच्या क्रिकेट जगातत काहीही होवू शकते याचा प्रत्यय 15 वर्षाच्या वैभव सुर्यवंशी याने दि. 21 जून 2026 रोजी श्रीलंका ए विरुध्दच्या 50 ओव्हरच्या (List A) ट्राय सिरीज फायनलमध्ये केवळ 11 चेंडुत अर्धशतक झकळवत क्रिकेट जगतात नवा इतिहास घडविला. या खेळीमुळे विस वर्षाचा पुर्वीचे वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत निघाले आहे.
20 वर्षापुर्वी 50 ओव्हरच्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कौशल्या विराट याचे नावावर होता सन 2005 मध्ये त्याने 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. तर वैभव सुर्यवंशीने फक्त 11 चेंडूत अर्धशतक करुन नवा इतिहास घडविला आणि नवा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर नोंद केला.
रांगिरी या आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर प्रथम फलंदाजीला आलेल्या वैभवने श्रीलंकेच्या गोलंदाजाना फटकेबाजीमुळे सळो की पळो करुन सोडले त्याने पहिल्या 11 चेंडुवरच- 4,4,4,6,,6,0,6,4,4,6,6 असा रन रेट तयार केला.
स्थानिक बातम्याकरीता चॅनलला सबक्राईब करा
वेगवान असलेला गोलंदाज दुलज समुद्रिताच्या चेडुंवर षटकार मारीत अर्धशतक पुर्ण केले तर सामन्याच्या मोहम्मद शिराजच्या व सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने 26 रन काढले. या झालेल्या सामन्यामध्ये तो अर्धशतकावरच थांबला नाही तर त्याने 29 चेंडुमध्ये 94 रनाची तुफानी खेळी केली. त्यामध्ये 10 चौकार आणि 8 षटकाराचा समावेश आहे. सामन्याच्या नवव्या ओव्हरमध्ये तो बाद झाला. तरी 6 धावांनी त्याचे गतीमान असलेले शतक हुकले. आणि तो बाद झाला त्यावेळी त्याचा स्टाईक रेट 324.14 इतका होता.
याअगोदरच्या चार सामन्यात त्याची कामगिरी चांगली नसल्याने त्याच्या खेळाची टीका होत असली तरी हा नवा विक्रम घडवित टिकाकारांना आता चुप बसावे लागले आहेत. तरी 15 वर्षीय वैभव सुर्यवंशी च्या या खेळीने नवा इतिहास घडविला आणि त्याचे क्रिकेट जगतात या विक्रमाचे कौतुक होत असून भारतींयाकडून त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.
